19 C
New York
Saturday, May 18, 2024

कायर येथे अमृत कलश यात्रा उत्सव साजरी

कायर येथे अमृत कलश यात्रा उत्सव साजरी

 सुरेंद्र इखारे वणी :-  कायर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा उत्सव साजरा करण्यात आली . 

   स्वच्छता भारत मिशन जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती वणी व ग्रामपंचायत कायर यांचे वतीने ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच नागेश धनकसार यांनी ” स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाच्या माध्यमातून  शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , विवेकानंद विद्यालय कायर, अंगणवाडी च्या चिमुकल्या बालकांनी सुद्धा उपस्थिती लावली. त्यानंतर बँड पथकांच्या गजरात  चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अमृत कलश डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली व चौकाचौकात गावकरी महिलांनी अमृत कलशामध्ये मुठमुठभर माती टाकून माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा उत्सव साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच नागेश धनकसार, ग्रामसेवक वानखडे , ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी शंकर सोयाम,नंदकिशोर अंबोरे, सहायक शिक्षक सुरेंद्र इखारे, सतीश घुले, मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर, आकाश बोरूले, दिलीप कंदस्वार, व समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता चिमुकल्या विद्यार्थ्यांना भिसकीट पुडा देऊन करण्यात आली

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News