27.4 C
New York
Wednesday, July 17, 2024

चारगाव ते कळमना रस्त्याची दुर्दशा 

चारगाव ते कळमना रस्त्याची दुर्दशा 

 बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ; दखल घेण्याची गरज 

 रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी

सुरेन्द्र इखारे वणी :-  वणी तालुक्यातील चारगाव ते कळमना हा 1999 नंतर आज 2023 मध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यात आले परंतु येथील जडवाहतुकीमुळे दोन चार महिन्यातच संपूर्ण रस्त्याची वाट लागून गेली आहे या संततधार पावसाने रस्त्यावरील डांबर पूर्णपणे वाहून गेल्याने हा रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनधारकासह पादचाऱ्यांची  मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे म्हणून या रस्त्याच्या कामाची गुंनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

         चारगाव ते कळमना हा राज्य मार्ग असून या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे ते काम 46 कोटींचे होते केवळ चार महिन्यातच संपूर्ण रस्ता उखडून पूर्णपणे वाहून गेला आहे व ठिकठिकाणी खड्डे पडले असून नवीन बांधलेल्या रस्त्याची वाट लागून गेली आहे . या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने रस्त्याची पार वाट लागून गेली आहे तरीही लोकप्रतिनिधीचे व बांधकाम विभागाचे लक्ष नाही परंतु या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांचा अपघात होत आहे व  अनेक प्रवासी नागरिकांना अपघात होतो की काय? अशी भीती मनात बाळगून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दर सेकंदाला हजारो वाहनांची वर्दळ असते यामध्ये ट्रॅक, बसगाड्या, ऑटो, कालिपिवली, टुव्हीलर, चौदा व्हीलर, अठरा व्हीलर, आयव्हा, या मालवाहणातून क्षमतेपेक्षा जास्त खनिज वाहतूक असल्याने रस्त्याची पायवाट झाली आहे त्यामुळे या मार्गावर रहदारीच्ला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनधारक व प्रवाश्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तेव्हा रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दत्ता महाकुलकर व समस्त नागरिकांनी केली आहे . 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News