-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

पर्यटन क्षेत्र करू शकते देशाचा विकास – प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे प्रतिपादन

पर्यटन क्षेत्र करू शकते देशाचा विकास
– प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे प्रतिपादन

प्रवास व पर्यटन विभागात जागतिक पर्यटन दिवस उत्साहात

नागपूर जयंत साठे : पर्यटन क्षेत्र देशाचा विकास करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रवास व पर्यटन विभागात जागतिक पर्यटन दिवस बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते. यावेळी विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे उपस्थित होते.
भारत हा विपुल प्रमाणात तसेच वैविध्यपूर्ण नैसर्गिक संसाधनांनी नटलेला देश असल्याचे सांगत डॉ. दुधे पुढे म्हणाले की, तीन ऋतू भारताला मिळाले आहे. प्रत्येक राज्यामध्ये नैसर्गिक विविधता आहे. कुठे डोंगर, कोठे समुद्र तर कोठे वाळवंट असे सर्वच आपणाकडे आहे. सोबतच प्राचीन तसेच प्रगत भारतीय वास्तुशास्त्राची जगाला ओळख आहे. परंपरेने मिळालेल्या गोष्टींकडे आपण संधी म्हणून पाहिले नाही. त्याकडे संधी म्हणून पाहिले असते तर जगात आपण अव्वल दर्जावर असतो. येणाऱ्या काळामध्ये पर्यटन पहिल्या क्रमांकाचा व्यापार बनेल असे डॉ. दुधे म्हणाले. दुबई आणि सिंगापूर शहराने पर्यटन क्षेत्रामध्ये कसे भरीव काम करीत जगातील पर्यटकांना आकर्षित केले याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आपण देखील पर्यटन उद्योगांमध्ये प्रगती का करू शकत नाही.आनंद व समाधान मिळावे म्हणून आपण जीवनात प्रयत्न करतो. पर्यटनातून समाधान मिळते, आनंद मिळतो हे या विभागातील विद्यार्थ्यांनी लोकांना समजावून सांगावे लागणार आहे. तंत्रज्ञानामुळे वाचन कमी झाले‌. असे असले तरी प्रत्येक जण काही ना काही तरी करीत असतो. अशाच व्यक्तींकरिता प्रवास व पर्यटन क्षेत्र कार्यशीलता दाखविण्याचे क्षेत्र आहे. कमी भांडवलात चांगला व्यवसाय देणारे हे क्षेत्र असून या उद्योगांमध्ये मोठा पैसा असल्याचे ते म्हणाले. सोबतच विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांनी नागपूर परिक्षेत्रातील तसेच विदर्भातील दुर्लक्षित असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती गोळा करून त्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन डॉ. दुधे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार विभागातील अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय अमन गुंजेवार यांनी करून दिले. संचालन खुशी कांबळे हिने केले तर आभार नरेश मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमात जयंत साठे लिखित पुस्तक प्र.कुलगुरुंना भेट‌ देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद उपासनी, डॉ. अमरदीप बारसागडे, प्रा. शोभना मेश्राम, प्रा. मंजुषा डोंगरे, प्रा.परिमल सुराडकर,प्रा .भाग्यश्री हिरादेवे, प्रा.नेहा दुबे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रभास व पर्यटन विभागातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News