नृसिंह व्यायाम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्यानिमित्ताने स्वच्छता सेवा उपक्रम
सुरेन्द्र इखारे वणी :- येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणामध्ये 2 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारला सकाळी 7.00 ते 8.30 वाजेपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता सेवा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नृसिंह व्यायाम शाळा या संस्थेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले, संचालक दत्ताभाऊ मुजगेवार, रमेश शर्मा,कन्हैया पारखी ,विलास डहाळकर, समीर खान, ठाकूर भाऊ, अक्षय डोंगरे, उपस्थित होते . याप्रसंगी नृसिंह व्यायाम शाळेच्या पदाधिकारी, संचालक मंडळाने तसेच व्यायाम शाळेच्या लाठीकाठी चमू, कबड्डीची चमू यांनी स्वच्छता मोहीम राबविली यामध्ये लाठीकाठीच्या विद्यार्थिनी कु स्विटी उगले, वेदिका उगले, वैष्णवी मेश्राम, साहिल डोंगरे, वेदांतीका गेडाम, डिंपल बदखल, हर्षिता चामूलवार, अंजली उगले, गौरी पिदूरकर, तपस्या पारखी, छकुली वाढई, मानवी घोसरे, अवनी पिदूरकर, श्रद्धा देशमुख, मानसी वाढई, काजल गाडगे, रेवती ताजने, कुणाल ठोंबरे, सृजल गाडगे, यश काकडे, दुशांत आवारी, दानिश पठाण, अयाण शेख, फय्याज शेख, प्रेम मिश्रा शिवम ढाले, यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून देशाच्या स्वच्छ भारत मिशन उपक्रमात सहभागी होऊन एक तास श्रमदानाचे महत्व जाणले त्यानंतर उपस्थित व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डीच्या चमुना एक ग्लास दूध देऊन स्वच्छता सेवा उपक्रमाची सांगता करण्यात आली.