आयुष्य मंत्रालय भारत सरकार द्वारा लक्ष्मण इद्दे यांची योगा शिक्षक म्हणनू निवड
उपविभागात अभिनंदनाचा वर्षाव
सुरेन्द्र इखारे वणी :- आयुष्य मंत्रालय ,भारत सरकार द्वारा संचालीत योगा सर्टीफीकेशन बोर्ड यांचे मार्फत योगा शिक्षकांच्या विविध सात लेवल च्या परीक्षा आयोजीत करण्यात आल्या होत्या .
आयुष्य मंत्रालय भारत सरकार द्वारा घेण्यात आलेल्या योगा टीचर ॲंड इव्ह्यल्यूएटर परीक्षेमध्ये वणी येथील लक्ष्मणराव इद्दे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पंचायत समिती वणी यांनी प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केल्याने आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
सरकार मान्य प्रमाणपत्राचे आधारे शासन निर्धारीत केल्यानुसार आपल्या घरी,वार्डात ,परिसरात , विविध शाळेत,प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य वर्धीनी केंद्र ई.विविध ठीकाणी गरजेनुसार योगा वर्ग चालविता येते तसेच शासनाचे वतीने मानधन तत्वावर काही शासकिय ,खाजगी संस्थेत योग वर्ग चालविण्याची शासन परवानगी देण्यात आली आहे.
आयुष मंत्रालय ,भारत सरकार द्वारा एकूण सात लेवलच्या परीक्षा होतात. वणी परंतु गेल्या 15 वर्षांपासून जैताई मंदिर येथे योग वर्ग चालवीत होते. व दरवर्षी वणी येथे सामुहिक रित्या योग दिवस सुद्धा साजरा करीत होते. लक्ष्मण इद्दे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,पं.स.वणी यांनी योगा लेवल 3 ची परीक्षा म्हणजे *योगा टीचर ॲन्ड इव्ह्यल्यूएटर* ही परीक्षा पास करुन आयुष मंत्रालय भारत सरकारची डीग्री प्राप्त केली आहे.विशेष म्हणजे या परीक्षेला महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्र या योग शिक्षक संघटनेच्या माध्यमातून 20 योग शिक्षक परीक्षेला बसले होते त्यापैकी ते एकमेव परीक्षा पास झाले आहे.ही डीग्री प्राप्त करणारे वणी विभागातील ते एकमेव व्यक्ती असुन यवतमाळ जिल्ह्यातील ते सातवे व्यक्ती आहे. ही डिग्री प्रोफेशनल असुन यांचे आधारे त्यांना सार्वजनिक ठिकाणी योग वर्ग चालविणे व योगा लेवल 1 व लेवल 2 चा अभ्यासक्रम शिकवुन नवीन योग शिक्षक तयार करण्याची मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण वणी उपविभागात सर्व स्तरांतुन अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहेत.