वणीच्या कु.प्रणाली कामटकर ची महाराष्ट्र व्हॉलीबॉल शालेय संघात निवड.
सुरेंद्र इखारे वणीः – स्थानिक संस्कार व्हॉलीबॉल क्रिडा मंडळाची खेळाडू कु.प्रणाली कामटकर हिची पालघर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय 17 वर्षा खालील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत तिच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड झाली असून सदर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा तामीळनाडू येथे होत आहे. कु. सोनल खंडारे व तेजस्विनी नागपूरे यांची सुद्धा यास्पर्धेत अमरावती विभागाकडून निवड करण्यात आली होती. कु.प्रणाली ही वणी तालुका क्रिडा संकुल येथील संस्कार व्हॉलीबॉल क्रिडा मंडळाच्या मैदानावर सराव करत असते.
तिच्या निवडीबाबत वणीच्या क्रिडाक्षेत्रात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षक रुपेश पिपंळकर यांना दिले .संस्कार व्हॉलीबॉल क्रिडा मंडळाचे अध्यक्ष विजुभाऊ मुकेवार. सचिव सय्यदबाबू ,वणी तालूका क्रिडा अधिकारी सचिन मिलमिले ,घनशाम वरारकर , एसपीएम विघालयाचे मुख्याध्यापक क्षीरसागर, इंदू सिंग , वरिष्ठ खेळाडू जवाहर हुसैन , संतोष बेलेकर, सुधीर वांढरे, प्रदिप कवराशे, गणेश पिदूरकर, सुरज आवताडे, विशाल कोंगरे यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले आहे.