जेष्ठ छायाचित्रकार जयंत हरकरे यांचे निधन
जयंत साठे नागपूर दि ८– महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत मुरलीधर हरकरे यांचे आज सायंकाळी निधन झाले. मृत्यू समयी ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. जयंत हरकरे यांच्या पार्थिवावर उद्या दि ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजता अंबाझरी स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.