21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

कायरच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग 8 वि चा नियमबाह्य वर्ग  मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने सुरू  * 

कायरच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग 8 वि चा  नियमबाह्य वर्ग  मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने सुरू  *  नियमबाह्य वर्गामुळे शासनाला भुर्दंड  * प्रशासन हतबल * शासनाला लक्ष देण्याची गरज *   

   सुरेंद्र इखारे  वणी-  कायर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मागील पाच सहा वर्षांपासून वर्ग 8 वि चे नियमबाह्य वर्ग येथील  मुख्यध्यपकांच्या पुढाकाराने  सुरू असल्याने नियमबाह्य वर्गासाठी शासनाच्या तिजोरीवर भुर्दंड पडून आर्थिक नुकसान होत आहे.  

           शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वर्ग  5 वि ते 8 वि चे विहित अंतराचा निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांनी नियमबाह्य वर्ग बंद करून त्या वर्गातील विद्यार्थी नजीकच्या शाळांमध्ये स्थानांतरित करणे आवश्यक असताना सुध्दा कायर येथील जिल्हा परिषद शाळेंनी  वर्ग 8 वि चा नियमबाह्य वर्ग सुरू ठेवून शासनाच्या शासन निर्णयाची पायमल्ली केली आहे.  येथील  मुख्याध्यापकांच्या मनमानी व मुजोर कारभारामुळे शासनाचा शालेय पोषण आहार व शालेय गणवेश व अतिरिक्त शिक्षकांची भरणा होत असल्याने शासनाला विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.  

              कायर येथील जिल्हा परिषद शाळेचा वर्ग 8 वि चा नियमबाह्य वर्ग बंद करण्याबाबतचा आदेश मा शिक्षणाधिकारी पागोरे साहेब व गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर साहेब यांनी दिले असताना सुध्दा येथील  मुख्यध्यपकांनी नियमबाह्य वर्ग सुरू ठेवून प्रशासनाला केराची टोपली दाखविली आहे.  त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे. तसेच आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता कायरच्या  मुख्यध्यपकाने वर्ग 1 ते 7 ची विद्यार्थी संख्या कमी असल्याने संच मान्यतेच्या दृष्टीने वर्ग 8 चा नियमबाह्य वर्ग ठेवून त्या वर्गाच्या शिक्षकाला वाचविण्यासाठी येथील   मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार व अधिकाराचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक करीत आहे. तसेच कायर येथील पालकांना वर्ग 8 वि ला मान्यता असल्याची खोटी माहिती देऊन पालकांची दिशाभूल करीत आहे.  कारण येथील जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गाचा दर्जा खालावलेला असल्याने कायर येथील पहिल्या वर्गाचे  संपूर्ण विद्यार्थी कायरच्या इंग्रजी शाळेत जात असल्याने जिल्हा परिषद शाळेने वरच्या वर्गाची अडवणूक करून विद्यार्थी संख्येसाठी वर्ग 8 वि चा नियमबाह्य वर्ग सुरू ठेवला आहे .कायर येथे 1983 चे अनुदानित माध्यमिक विवेकानंद विद्यालय असून या  शाळेत वर्ग 9 व 10 वि ला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे केंद्र सुध्दा  आहे . परंतु येथील वर्ग 8 च्या अनुदानित शिक्षकांना अतिरिक्त करून शासनाचे नुकसान करीत आहे.तेव्हा  शासनानेच त्वरित कार्यवाही करून जिल्हा परिषद शाळेतील नियमबाह्य वर्ग बंद करून शासनाने प्रशासन व्यवस्थेला अधिक अधिकार देऊन नियमबाह्य वर्ग बंद करण्याचे आदेश द्यावेत  व  मुख्याध्यापकावर कारवाई करून  शासनाचे झालेले नुकसान भरपाई वसूल करावी व वर्ग 8 वि चा नियमबाह्य वर्ग बंद करावा अशी मागणी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्यध्यपकांने केली आहे. . 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News