* धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी
* उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन
सुरेंद्र इखारे वणी -: आदिवासी आरक्षण हे सवैधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही धनगर किंवा अन्य कोणत्याही जातीची घुस्करी करू नये धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा म्हणून प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असून ती बेकायदेशीर आहे. सदर धनगर व धनगड दोन्ही भिन्न जाती आहे. त्यामुळे धनगरांना अनुसूचित जातीचे आरक्षण देता येणार नाही. असे स्पष्ट सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे असे असताना धनगरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावी. अशी मागणी चुकीची आहे. तेव्हा धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी बिरसा ब्रिगेडने निवेदनातून केली आहे.
आदिवासी संस्कृती, परंपरा, राहणीमान, जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती, तसेच विशिष्ट प्रदेश वास्तव्यात असलेला व स्वतंत्र बोली भाषा असलेला समाज आहे आदिवासी संस्कृती ही धनगर समाजाची अजिबात मिळती जुळती दिसत नाही आदिवासी समाजाचे रितीरिवाज रूढी परंपरा भाषा जीवनशैली स्वतंत्र आहे. आदिवासी समाज व धनगर हे दोन वेगवेगळे समाज आहे आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठलाही बाबतीत ताडमिळ बसत नसून आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं ७% आरक्षणाच्या पण मिळाले नाही कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासी बोगस जात पडताळणी दाखले देत आदिवासी झालेली आहे . खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस आदिवासी एखाद्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या अडकून बळकावले आहे अशा एकूण ७५ हजार बोगस कर्मचाऱ्यांना आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडपून बळकवले आहे अशा एकूण ७५००० कर्मचाऱ्यांचा सेवा संघ संरक्षण देण्याचा निर्णय २९ ला शासनाने घेतलेला आहे. गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतला आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होऊ नये याबाबतचे आरक्षणात धनगर समाजाला समावेश करू नये.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बिरसा ब्रिगेड व आदिवासी समाजा वतीने ज्वलंतशील आंदोलन करण्यात येईल . याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील करिता. करिता धनगर आरक्षण या प्रश्नाला घेऊन बिरसा ब्रिगेड च्या वतीने आज उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी उपस्थित सुधाकर चांदेकर ( बिरसा ब्रिगेड अध्यक्ष) , कवडूजी उईके (तालुका संघटक), विजय गेडाम, प्रशांत जुमनाके (बिरसा ब्रिगेड प्रसिद्ध प्रमुख) सुभाष पेंदाम, प्रवीण आत्राम, राजू गेडाम, प्रदीप गेडाम, दत्ता कुळमेथे, लक्ष्मण परचाके, निखिल खिरटकर, गोपाल हनुमंते , केशव मेश्राम, संतोष कुडमेथे, गणेश कोरचे , समीर मडावी, लहानू सालुरकर, पवन मेश्राम, मारुती कुंबरे, नथू कुंभरे, जयंत गेडाम पांडुरंग पेंदोर, रोहित टेकाम ,अर्चनाताई किनाके , सविता कुडमेथे प्रियंका कुडमेथे, प्रियंका कुळसंगे, शितल मडावी, विजय केराम , हंसराज भादेकर सुकेशना गेडाम , हे उपस्थित होते.