हजारों महिला आपले पोरं बाळ घेऊन स्वतःच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला...
सुरेंद्र इखारे वणी :- सकल धनगर समाज यांच्या वतीने ता.वडवणी जि बीड येथे अहिल्यादेवी होळकर चौक ते तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे या समाजाची मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे या आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन मोठाले मोर्चे ,रस्ता रोको ,केले तरी या सरकारला या धनगर समाजाची दया आली नाही प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून घेऊ असे न होता या समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत यासाठी वडवणी येथे सकल धनगर समाज वडवणीच्या वतीने हजारोंच्या संख्येने आपले लहान तीन- चार महिन्यांचे लेकरं, शेकडो युवक,शेकडो युवती आपल्या स्वतःच्या एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी वडवणी तालुक्यातील धनगर समाज एकत्र आलेला दिसला या मोर्चात पंचक्रोशीतील वाडी वस्ती,तांडा,खेडेपाड्यातुन हजारांच्या संख्येने समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेला दिसला जर या राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राज्यभर आंदोलन मोर्चे रस्ता रोको करण्यात येईल असे या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी संबोधित करताना सांगितले.
प्रमुख मागणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.
अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर अंमलबजावणी करण्यात यावी
मध्ये प्रदेश मधील इंन्दौर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात यावे या मागणीसाठी आज वडवणी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला
या मोर्चात शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज आज रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध व या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या येळकोट येळकोट जय मल्हार या नावाने वडवणी शहरात वातावरण पिवळं दिसतं होते जागोजागी युवकांच्या गळ्यात पिवळा गमजा व कपाळी पिवळा भंडारा दिसत होता आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी यूवकांच्या माताभगिंच्या तोंडातुन एकच आवाज उठ धनगरा जागा हो एस टी आरक्षणाचा धागा हो या घोषणेने वडवणी शहर दणदणली होती.
या मोर्चाचे आयोजन सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.