19 C
New York
Saturday, May 18, 2024

वणी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

वणी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

दुर्गाउत्सव, नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिन नियमात राहून साजरा करा 

       सुरेंद्र इखारे वणी :-   येथील पोलीस स्टेशनमध्ये आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 6.00 वाजता वणी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शांतता समितीची बैठक पार पडली.

         या सभेचे अध्यक्षस्थानी एसडीपीओ गणेश किंद्रे हे होते. प्रमुख उपस्थिती वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, वाहतूक नियंत्रक अधिकारी एपीआय सीता वाघमारे तसेच  एपीआय दत्ता पेंडकर, उपस्थित होते.  यावेळी उपस्थित शांतता समितीच्या सभासदांनी  मनोगत व्यक्त करताना अपेक्षा सुद्धा वणी पोलीस विभागाकडून केली आहे. वणी शहरात सर्वकाही”ऑलवेल” असल्याचे सूतोवाच यावेळी केले. परंतु यामध्ये शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था, ट्युशनवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची बेशिस्त वाहतूक, शहरातील वाढती गुंडगिरी, बंद घरामध्ये चोऱ्या होण्याची शक्यता, मंडळात रात्री सुरू असणारा जुगार, अश्लील गाणे वाजणार नाही याची दक्षता घेणे , रात्रीच्या वेळी वीज पुरवठा बंद होणार नाही व रस्त्याची दुरुस्ती करून दुर्गा स्थापना व विसर्जन करताना त्रास होणार नाही, व शहरातील नागरिकांना दुर्गा विसर्जन पाहता येईल या दृष्टीने केबलची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून गर्दी होणार नाही यासंदर्भात बऱ्याचश्या सूचना यावेळी शांतता समितीचे सदस्य मंगल तेलंग, निलीमाताई काळे, शालिनीताई रासेकर, बांगरे ताई, साहिदभाई शेख, यांनी सांगितले तेव्हा वणी शहरात साजरा होणारा  दुर्गाउत्सव ,नवरात्र , धम्मचक्र प्रवर्तन दिनी वणी शहरात अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे परंतु वणी शहराची शांतता भंग करणाऱ्या  गुंडप्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी केले आहे.  खरं तर दुर्गाउत्सव हा स्त्रियांचा सण नाही तर पुरुषांचा असून दुर्गेला शरण जाणे व शक्तीला वंदन करण्याचा व कौतुकाचा क्षण आहे जेणेकरून या उत्सवाला गालबोट लागणार नाही याचा प्रयत्न करणे अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणेदार अजित जाधव यांनी कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचा पाढा वाचला जेणेकरून मंडळ व पोलीस प्रशासन यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये व सहकार्याची अपेक्षा केली आहे . वाहतून नियंत्रक सीता वाघमारे यांनी सुद्धा स्त्रियांना दागिन्यांच्या संदर्भात काही टिप्स दिल्या आहे तेव्हा स्त्रियांनी सजग राहल पाहिजे असा सल्ला दिला आहे. परंतु या शांतता समितीच्या सभेमध्ये नगर परिषद मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालय , एमएसइबी अभियंता, व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते तेव्हा संपूर्ण शहराच्या शांततेची जबाबदारी वणी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले असून मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहेत. सभेचे सूत्रसंचालन ठाणेदार अजित जाधव यांनी केले तर आभार वाहतूक नियंत्रक सीता वाघमारे यांनी मानले. यावेळी वणी शहरातील  दुर्गाउत्सव मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच शांतता समितीच्या सदस्यांनी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सभेच्या यशस्वीतेसाठी सहायक उपनिरीक्षक शेखर वांढरे, आत्राम व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News