पत्रकार मिलिंद फुलझेले यांची लेखणी समाजोन्नती करिता उपयुक्त – प्रा. देविदास घोडेस्वार
नागपूर जयंत साठे: झुंजार पत्रकार मिलिंद फुलझेले यांनी आपले लेखनी सामाजिक न्याय, समता व आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी झिजवली होती. प्रस्थापित मिडियाचे विरोधात जाऊन त्यांनी जी राजकीय पत्रकारिता केली तिला तोड नाही.असे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक प्रा .देविदास घोडेस्वार यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले. स्मृतिशेष मिलिंद फुलझेले यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बी.सी.साखरकर, प्रमोद वासनिक, सुधीर भगत उपस्थित होते.
यावेळी पत्रकार मिलिंद फुलझेले यांनी दैनिक महानायक ला लिहिलेल्या निवडक संपादकीय लेखांचे ‘महानायकाचा आक्रोश’ या ग्रंथाचे रुपाने प्रकाशन करण्यात आले. हरीश जानोरकर, प्रा.महेंद्र राऊत, अमिताभ पावडे, राजन वाघमारे, दीक्षित आवळे, माधुरी लोखंडे, उत्तम शेवडे, विनोद आटे, प्रकाश गोविंदवार, राहुल दहीकर, प्रदीप मून, राहुल मुन, वर्षाताई मिलिंद फुलझेले, अशोक जांभुळकर, वामन सोमकुवर, अतुल खोब्रागडे, आशिक बनसोड, आदींनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करून मिलिंद फुलझेले यांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन अशोक जांभुळकर,प्रास्ताविक प्रमोद वासनिक यांनी केले. स्मृतिशेष मिलिंद फुलझेले मित्रपरिवार यांनी केले.