25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

आम्ही विदर्भ कन्या कार्यक्रमाने जिंकली वणीकरांची मने.

शारदीय नवरात्र उत्सवात आम्ही विदर्भ कन्या कार्यक्रमाने जिंकली वणीकरांची मने.

सुरेन्द्र इखारे वणी :- “जो देश आपला इतिहास विसरतो त्याला भविष्य नसते.” या स्वामी विवेकानंदांच्या वचनाला आधारभूत मानून विदर्भाच्या इतिहासाला त्यातही प्राधान्याने नवरात्र उत्सवाच्या या पावनपर्वकाळात विदर्भातील स्त्रीशक्तीच्या दैदिप्यमान इतिहासाला सादर करण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर येथील वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या
आम्ही विदर्भ कन्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने वणी नगरीतील सुविधा जनतेचे मन जिंकले.
जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्र उत्सवात तिसऱ्या दिवशीची सेवा करताना हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
सुषमा मुलमुले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदनाची महत्वपूर्ण जबाबदारी वृषाली देशपांडे यांनी समर्थपणे पेलली.अभिषेक काणे यांच्या संगीत नियोजनाने आणि
सारंग मास्टे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वृद्धिंगत झाली.
रुक्मिणी तथा जिजामातेची दिपाली घोंगे यांनी केलेली भूमिका श्रोत्यांच्या सर्वाधिक पसंतीचा विषय ठरली , दमयंतीची भूमिका नुपूर देशपांडे
साधना आमटेंची भूमिका मृगा पागे यांनी तर प्रतिमा इंगोले यांची भूमिका पल्लवी मुलमुले यांनी सादर केली. कल्याणी गोखले यांनी लोपामुद्रा आणि ताराबाई शिंदे यांच्या प्रभावशाली भूमिकांसोबतच या संपूर्ण प्रयोगाचे दिग्दर्शन देखील केले हे विशेष उल्लेखनीय.
सूत्रसंचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News