दीक्षाभूमीवर भव्य महिला धम्म परिषद- 21 ऑक्टोबर रोजी
‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाचे समकालीन संदर्भ व वास्तव’ यावर परिचर्चा
नागपूर, जयंत साठे : ६७व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी एक दिवसीय महिला धम्म परिषद शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांनी आयोजन केले आहे.
परिषदेचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता होणार असून उद्घाटनाला माजी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड भन्ते सुरई ससाई, भिक्खूनी धम्मदिना, डॉ माधवी खोडे, कीर्ती अर्जुन गवई, प्राचार्य भुवनेश्वरी मेहरे उपस्थित राहणार आहेत. एकपात्री प्रयोग डॉ विना राऊत, वंदना जीवने, चळवळ(पल्लवी जीवनतारे), संथागार फाउंडेशन प्रस्तुत संविधान जागर नाट्यकृती सादर होणार आहेत.
परिसंवादात डॉ प्रज्ञा बागडे, डॉ वैशाली बांबोळे, डॉ. हेमलता महेश्वर(दिल्ली), जसविंदर कौर(पंजाब), छायाताई खोब्रागडे, सहभागी होणार आहेत.
सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एकांकिका बहुजन रंगभूमी प्रस्तुत व वीरेंद्र गणवीर लिखित ‘गटार’ ही एकांकिका सादर होणार आहे.
परिषदेच्या समारोपात ‘काव्यफुलें’ कविसम्मेलन जेष्ठ कवी साहित्यिक इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली व सुनीता झाडे यांच्या विशेष उपस्थितीत सादर होणार आहे.
या परिषदेला आंबेडकरवादी, समतावादी महिला पुरुषांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या अध्यक्ष डॉ कमलताई गवई(माजी लेडी गव्हर्नर), व सचिव तक्षशिला वागधरे यांनी आवाहन केले