वणी तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्र उपलब्ध करावे
शेकडो नागरिकांची मागणी
जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालयाला दिले निवेदन
सुरेंद्र इखारे/जयंत साठे : वणी तालुक्यातील रुग्णांसाठी वणी येथे ग्रामिण रुग्णालय अस्तित्वात असुन येथे विविध आजारांसाठी रक्त तपासणी करण्यांत येते व यासाठी संबंधित रुग्णांचे रक्तांचे नमुने सुध्दा घेण्यांत येते. परंतु सदर रक्त तपासणी नमुने हे पांढरकवडा येथील रक्त तपासणी केंद्रात (Blood Test Center) पाठविण्यांत येत असुन त्याचा रिपोर्ट तब्बल सहा ते सात दिवसांनी प्राप्त होत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असल्यास व रक्त तपासणी अहवाला अभावी संबंधीत रुग्णाला आवश्यक उपचार वेळेत प्राप्त न झाल्यास सदर रुग्णाला उपचारा अभावी जिव गमवावा लागतो याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरी बाब अशी की, सध्या संपुर्ण राज्यभरात डेंगु या जिवघेण्या आजाराने थैमान घातले असुन सदर आजारावर वेळेत उपचार न झाल्यास रक्त तपासणी अहवाल विहीत कालावधीत प्राप्त न झाल्यास रक्त तपासणी अहवाला अभावी आवश्यक उपचार न झाल्याने जिव गमवावा लागु शकतो. असाच प्रकार सुदैवाने घडला नाही. एका रुग्णाचे दिनांक 07/10/2023 रोजी वणी येथील ग्रामिण रुग्णालयात रक्त तपासणीसाठी रक्त घेण्यांत आले. त्याचे रिपोर्ट तब्बल 5 ते 6 दिवसांनी प्राप्त होणार होता. परंतु सदर रुग्णाला त्रास वाढल्यामुळे खाजगी दवाखाण्यात नेऊन रक्त तपासणी केली असता चक्क “डेंगु” या आजाराचे लक्षण दिसले व तात्काळ उपचार मिळाल्यामुळे सुदैवाने अनुचित घटना घडली नाही. अशा प्रकारे नागरिक त्रस्त असल्यामुळे येथे रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करावी अशी नागरिकांची मागणी आहे. निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.