सीईओ साहेब आम्हला डॉक्टर द्या, पं. स.च्या पशु संवर्धन विभागात घातल्या आजारी शेळ्या
वणीत वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
पशु चिकित्सकांच्या रिक्त पदांमुळे तालुक्यातील आजारी मुक्या पशूंना मिळे ना उपचार
सुरेन्द्र इखारे वणी :– येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पशु संवर्धन विभागात आम्हला डॉक्टर द्या म्हणत शेळ्यांना स्टिकर चिपकवून आज ता. २० रोजी दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पशु संवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व पशु पालकांच्या जनावरांना सुरळीत उपचार मिळत नसल्याने जनावरे विविध आजाराने मृत पावत आहे. तालुक्यात श्रेणी १ ची पाच तर श्रेणी २ ची आठ रुग्णालये असून यातील श्रेणी २ ची पाच पदे रिक्त आहे तर श्रेणी २ ची चार पदे रिक्त असुन विस्तार अधिकारी देखील रिक्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयात प्रभावर कारभार चालू असल्याने वेळेवर जनावरांना कोणताच उपचार मिळत नसल्याने जनावरे मृत पावत आहे. त्यामुळे शेतकरी व पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने सदर पदे भरून मुक्या जनावरांना सुरळीत सेवा पुरविण्याची मागणी केली होती. परंतु शासनाच्या कोणत्याच हलचाली न झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी तालुक्यातील आजारी शेळ्या आणून चक्क पशु संवर्धन विभागात आणून भरल्या व त्या शेळ्यांना आम्हला डॉक्टर द्या असे स्टिकर लावले होते. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत असून जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी या आंदोलनाची दखल घेऊन शासनाकडे लवकरात लवकर सदर पदे भरण्यासाठी प्रस्ताव दाखल करू असे आश्वासन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव अर्चना कांबळे, जिल्हाउपाध्यक्षा वैशाली गायकवाड, जिल्हा संघटक ताई डोंगरे, तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, शराध्यक्षा अर्चना नगराळे, उपाध्यक्षा प्राणिता ठमके, अर्चना दुर्गे, सीद्धी करमनकर, अंजु पासवान, सुनीता दुपारे, कीर्ती लभाने, कपिल मेश्राम, सोनू दुर्गे, पिंटू डगावकर, चेतन रामटेके, अमोल दुपारे, अंकित पिदूरकर, आदी या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ डहाके हे उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वणी पोलीसही आंदोलनस्थळी दाखल झाले होते.