25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

सुरेन्द्र इखारे वणी :-   तालुका विधी सेवा समिती वणी आणि समाजशास्त्र विभाग लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिर लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये दिनांक 27/10/2023 ला सपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद खानझोडे प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. श्री सुधीर म. बोमिडवार दिवाणी न्यायाधीश वणी होते. तसेच प्रमूख वक्ते ॲड. डी. एम. ठाकूर अधिवक्ता वणी आणि सौ. मायाताई चाटसे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
श्री. सुधीर बोमीडवार दिवाणी न्यायाधीश वणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी कसं वागावं, आपण सहज जरी वागत असलो तरी नजर चुकीने आपल्या हातून जे गुन्हे घडतात त्या सामाजिक समस्याचे रूप घेतात आणि या सामाजिक समस्या निर्माण होऊ नये यासाठी नवतरुणांनी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. मायाताई चाटसे यांनी सायबर क्राईम आणि चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्विसेस या विषयावर मार्गदर्शन केले. सामाजिक समस्या या मानवनिर्मित आहेत. आणि त्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण काय करावं या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतरचे वक्ते श्री. डी. एम. ठाकूर अधिवक्ता वणी यांनी प्रोटेक्शन फॉर चिल्ड्रन ,राइट्स ऑफ चिल्ड्रन्स, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रिया विषयक गुन्हे, बाल गुन्हेगारी, या विषयावर मार्गदर्शन करताना कायदे आणि त्याचे फायदे व तोटे या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी आजचा युवक हा उद्याचा सुदृढ नागरिक बनावा या विषयावर मार्गदर्शन केले व्यसन आणि गुन्हे या गोष्टीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. या शिबिरा नंतर विद्यार्थ्यांनी समाजात या विषयावर जनजागृति करावी अशी अपेक्षा दर्शविली. या कायदेविषयक शिबिराचे आयोजन समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर नीलिमा दवणे आणि प्राध्यापक किशन घोगरे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा .नीलिमा दवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी निखाडे हिने केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News