12.9 C
New York
Monday, May 20, 2024

वणीत शारदा महोत्सवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन

वणीत शारदा महोत्सवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन

      शारदा महोत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

 सुरेन्द्र इखारे वणी :– येथील धनोजे कुणबी विकास संस्थेद्वारे शारदा महोत्सव निमित्ताने दिनांक 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत धनोजे कुणबी विकास संस्था वणी सांस्कृतिक भवन येथे  आगळ्यावेगळ्या व अप्रतिम स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तसेच मार्गदर्शक म्हणून ब्लड कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ रिया बाललीकर ह्या होत्या. उद्घाटक मा आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख पाहुणे प्रा माधवी बदखल, संस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर, साधना गोहोकार, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी देरकर, सत्कारमूर्ती रजनी आत्राम, मोनाली गोवारदीपे, साधना मत्ते उपस्थित होत्या. 

           दररोज होणाऱ्या शारदा मातेच्या आरतीचे आयोजन आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून महाआरतीत रूपांतर होत असल्याने संपूर्ण महिला भक्ती भावाने तल्लीन होऊन जात असे त्यानंतर अध्यात्मिक,बौद्धिक व सांस्कृतिक माध्यमातून विविध स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विविध खेळ, नृत्य, प्रदर्शनी, चर्चा सत्र, फॅन्सी ड्रेस, नकला इत्यादी स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसेच जागरण व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व विजयी महिला सखींचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले होते. 

       कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मीनाक्षी देरकर, लता वासेकर, संगीता खाडे, स्मिता नांदेकर, सविता गौरकर, वंदना आवारी, अर्चना बोदडकर, कविता चटकी, वनिता काकडे, रुपाली कातकडे, शारदा ठाकरे, संध्या बोबडे, व समस्त धानोजे कुणबी विकास संस्थेच्या जेष्ठ महिला व सदस्यांनी परिश्रम घेतले

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News