बी आर एस पी चा ग्रामपंचायत मध्ये प्रवेश
नागपूर जयंत साठे — नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला आहे.
रामटेक तालुक्यातील मांद्री या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृपासागर भोवते यांच्या नेतृत्वात पॅनल तयार करून निवडणूक लढण्यात आली .या निवडणुकीत स्वतः जिल्हाध्यक्ष कृपासागर भोवते उमेदवार होते.
त्यांच्यासह पाच ग्राम पंचायत सदस्य पॅनल मधून निवडून आले.
विजयी उमेदवारांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी अभिनंदन केले.