-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

सार्वजनिक महिला समाज वणीवतीने ६८ वा शारदोत्सव थाटात  साजरा 

सार्वजनिक महिला समाज वणीवतीने ६८ वा शारदोत्सव थाटात  साजरा 
सुरेन्द्र इखारे वणी :-  येथे सार्वजनिक महिला समाज मंडळावतीने शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

सार्वजनिक महिला समाज मंडळाच्या  अध्यक्षा  सौ.शालिनी गंगशेट्टीवार या अध्यक्षस्थानी होत्या. उद्घाटक  वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मा.श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार,तसेच प्रमुख अतिथी  सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विजयबाबू चोरडिया हे उपस्थित होते.
शरदोत्सवामध्ये   वेगवेगळ्या स्पर्धा,१मिनीट गेम,आगळेवेगळे खेळ, नृत्य,नाट्य,व्याख्यान, लाठीकाठीअशा विविध उपक्रमांची मेजवानी देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला.
या उत्सवाला 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. समाजाच्या संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्षा मा.श्रीमती उमरावबाई गेलडा यांच्या हस्ते मावळत्या अध्यक्षा सौ.किरणताई देरकर यांचा निरोपीय सत्कार करण्यात आला.विविध कार्यक्रमामधे प्रमुख आकर्षण म्हणजे कु.तेजस्विनी गव्हाणे हिचे छत्रपती शिवरायांवरील तेजस्वी भाषण व त्यांच्या समुहाचे स्वसंरक्षणासाठी केलेले लाठीकाठी प्रदर्शन हे केवळ चिमुकल्याने सादर केल्याने झाले असून उपस्थितांना मंत्रमुग्ध  अचंबित करून टाकणारे होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सौ.शालिनी गंगशेट्टीवार, उपाध्यक्ष सौ.भावना गंगमवार,सचिव सौ.स्वप्ना वि.पावडे, सहसचिव सौ.माधुरी कोंडावार, कोषाध्यक्ष सौ.स्नेहलता चुंबळे.सर्व कार्यकारिणी सदस्यस सल्लागार आमंत्रित तथा गृप लीडर सौ.निलीमाताई काळे,सौ.ज्योतीताई ज.कोंडावार,सौ.किरणताई कुंचमवार,सौ.शुभदा मोत्येलवार ,सौ.प्रीती ताटेवार सर्व भगिनींनी सहकार्य करून परिश्रम घेतले  .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News