एकजुटीनेच वंचितांचे हक्क प्राप्त करू
राष्ट्रीय एकता आंदोलन सभेत एकमत
नागपूर, जयंत साठे – सध्या देशात खाजगीकरणाचे दुषपरिणाम दिसत असून केंद्र सरकार फक्त दोन उद्योगपतीसाठी सर्व सार्वजनिक उद्योग हवाली करित आहेत. बेरोजगारी वाढली, तरुण शिक्षित होऊन रस्त्यावर फिरत आहेत. शिक्षण सेवेचे बाजरीकरण करण्यात आले, सरकारी शाळा बंद करून सामान्य गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे षडयंत्र आहे. खाजगीकरण, कंत्राटी करणाने कर्मचारी नैराश्य ग्रस्त झाला, आरक्षण संपविले आहे. ओबीसी sc st, अल्पसंख्यांक यांचे संविधानिक अधिकार हळू हळू संपविले जात आहेत, सर्व समाजाच्या एकजुटीटीनेच आपले हक्क प्रात होऊ शकतात असे राष्ट्रीय एकता आंदोलन द्वारा आयोजित सभेत विविध संघटना प्रमुखांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचे अध्यक्षस्थानी अरुण गाडे काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व अध्यक्ष राष्ट्रीय एकता आंदोलन हे होते. राष्ट्रीय एकता आंदोलन बहुजनाच्या मुक्ती साठी कार्य करणारे असून या आंदोलनात सर्व सामाजिक व कामगार संघटनानां सहभागी करून राष्ट्रीय स्तरावर प्रभावी संघटन निर्माण करावंयचे उद्धीष्ट घेऊन या संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे, अशी भूमिका अब्दुल पाशा यांनी मांडली.काम्रेड अरुण वनकर यांनी देशात अराजक स्थिती असून जनतेमध्ये जन जागृतीसाठी गोंदिया ते मुंबई महामोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण राज्यात संपर्क अभियान राबवावे व हा महामोर्चा लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोजित करावा असे म्हटले. ट्रांईब ऑफिसर फोरमचे आर डी आत्राम यांनी प्रथम समाजकल्याण विभागात 5200रुपये प्रमाणे वसतिगृह विध्यार्थी यांचे जेवणाचे कंत्राट श्रीमंत व्यक्तीच्या खाजगी कम्पनीला दिले असून यामधून सरळ भ्रष्टाचार होणार आहे. व सरकार मधील दलालाना दलाली मिळणार त्यामुळे प्रथम सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्तीबाबत व भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आंदोलन करावे. शैक्षिनिक व सामाजिक मागासलेल्या मुस्लिम समाजाला 5%आरक्षणची मागणी करण्यासाठी आंदोलन करावे.,असे जनार्दन मुन यांनी सूचित केले. या सभेला पद्माकर गणवीर,राष्ट्रीय बौद्ध महासभा,यांनी समाजाला न्याय देण्यासाठी लढा देणारे अरुण गाडे यांच्या सोबत आम्ही सर्व सोबत आहो. परिवर्तनाची लढाई यशस्वी करण्यासाठी सर्व वंचित, शोषित समाजाची एकजूट आवश्यक आहेत त्यासाठी सर्वांनी निष्टने साथ द्यावीअसे अरुण गाडे यांनी आवाहन केले ..या सभेला राहुल सोमकुवर समता सैनिक दल, ऍड अजय निकोसे, ऍड शैलेश मेश्राम, श्यामराव हाडके, जयंत साठे,प्रा एम एस वानखेडे, एम एस जांभुळे,अशोक पाटील ऍड हर्षवर्धन मेश्राम,राजेश ढेंगरे, सुगत रामटेके, रंजीत रामटेके,अरविंद पाटील व अनेक सामाजिक, कामगार संगठनाचे प्रतिनिधी उपस्थित होते, सभा संचालन सिताराम राठोड, भूमिका, अब्दुल पाशा व आभार सुगत रामटेके यांनी केले.