व्यवस्था परिवर्तन साठी संघटनाची एकजूट व्हावी -अरुण गाडे
नागपूर जयंत साठे – डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ब्राम्हणशाही व भांडवलशाही पासून धोका असून कामगारांनी सावध व्हावे असा इशारा कामगारांना दिला होता आम्ही दुर्लक्ष केले.
आज देशात खाजगीकरण, कंत्राटीकरण या मुळे कामगार उध्वस्त होत आहेत, नोटबंदी, उद्योगपतीचे कर्जमाफी, शिक्षणाचे बाजरीकरण, शाळा बंद धोरण हुकूमशाही पद्धतीने घेतले जात आहेत, न्यायालयतील सर्व न्यायाधीश उच्च वर्गाचे असल्याने बहुजनांना न्याय मिळत नाही,शासन सेवेतील महत्वाची पदे उच्च वर्णीयानी काबीज केले,लाट्रल एन्ट्री द्वारे महत्वाच्या पदावर उच्च वर्गाचे अधिकारी बेकायदेशीर पणे बसविले जात आहे.
आरक्षण संविधानात तरतूद नसताना उच्च वर्गाला 10% आरक्षण बहाल केले, अदानी अंबानी या उद्योग पतीच्या फायद्यासाठी सरकार देशाचे कायदे बदलवीत आहेत, कामगार हिताचे 44कामगार कायदे 4कायध्यात बदलविले आहेत, महगाई, बेरोजगारी जनता त्रस्त आहे. संविधानाचे अवमूल्यन करून कामगार व सामान्य जनतेवर गुलामी लादली जात आहे.हे सर्व बदलावयाचे असेल तर व्यवस्था परि वर्तन गरजेचे आहे त्यासाठी सर्व कामगार -कर्मचारी संघटनाची एकजूट व्हावी,एकूणच व्यवस्था परिवर्तन ची गरज आहे,त्यासाठी सर्व कामगार कर्मचारी संगठनानी एकजुटीतूनच व्यवस्था परिवर्तन करावे असे आवाहन अरुण गाडे,अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांनी विविध कामगार व कर्मचारी संगठनाच्या वतीने आम जनतेच्या शासकीय धोरणविरोधात काम्रेड ए बी बर्धनअडोटोरियम परवाना भवण नागपूर येथे आयोजित महासंमेलन प्रसंगी व्यक्त केले.
या महासम्मलनाचे आयोजन अशोक दगडे राज्य सरकारी मध्यवरती संघटना यांनी केले, महासम्मेलानाला काम्रेड अरुण वनकर, अ भा किसान मोर्चा, काम्रेड मोहनदास नायडू, आयटक, काम्रेड माधव भोंडे,काम्रेड प्रकाश काळे, काम्रेड मारोती वानखेडे तसेच अनेक कामगार कर्मचारी संगठनाचे प्रतिनिधी यांनी भूमिका विषद केली. काम्रेड अरुण वनकर यांनी महासम्मेलनाचे उद्धिस्ट सांगितले, अनेक वक्त्यांनी हुकूमशाही सरकार ला हाकलण्यासाठी कटीबंद्ध व्हावे असे आवाहन केले.या संमेलनलंनाला जवळपास 100संगठनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन, भूमिका व आभार अशोक दगडे यांनी केले.