19 C
New York
Saturday, May 18, 2024

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात २५ नोव्हेंबरला वैकुंठ महोत्सव

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात २५ नोव्हेंबरला वैकुंठ महोत्सव
सुरेंद्र इखारे वणी :-  
येथील  सुप्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात शनिवार दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्त वैकुंठ महोत्सवाचे भव्य व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ नोव्हेंबर रोज शनिवारी सकाळी १० वाजता अनेक दांपत्या द्वारा रंगनाथ स्वामींच्या मूर्तीला महा अभिषेक होऊन महोत्सवाचा शुभारंभ होईल. त्यानंतर खालील प्रमाणे कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहेत.दुपारी १ ते२ ब्रह्मांडनायक गजानन महाराज उपासना मंडळ वणी द्वारा सामुहिक उपासना, दुपारी २ ते ४ विजयबाबू चोरडीया द्वारा महाप्रसाद , दुपारी ४ ते ७ ह.भ.प.
मनुमहाराज तुगनायत संच द्वारा विष्णुसहस्रनामावली पठन व भक्ती गीतांचा कार्यक्रम, सायं ७ ते ८
यज्ञ सेवा समिती द्वारा सामुहिक श्री सुक्त हवन , रात्री ८ ते ९ धार्मिक देखावे (झांकीया.
कार्यक्रमांची सांगता रात्री ९ ते १२ दीपोत्सव ,हरिहर मिलन , ब्रह्मोत्सव,, छप्पन भोग व महा आरतीने होईल.हरिहर मिलन कार्यक्रमाचे पौरोहित्य हिंगनघाट येथील पं.गोविंद महाराज जोशी करणार आहेत.सोबत वाद्यवृंदा सहित दक्षिण भारतातील वेदशास्त्रसंपन्न पंडित राहतील . या कार्यक्रमाला भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे व आपल्या घरुन छप्पन भोग करिता २५० ग्रॅम मिठाई आणावी  व या वैकुंठ महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन  आयोजकांनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News