12.9 C
New York
Monday, May 20, 2024

एक दिवसीय उद्योजकता कार्यक्रम संपन्न

एक दिवसीय उद्योजकता कार्यक्रम संपन्न

जयंत साठे नागपूर – महाराष्ट्र शासन उघोग संचालनालय अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र (MCED)उपकेंद्र एम. सी. ई. डी. हिंगना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १४-११-२०२३ रोजी पांचपावली ठक्कर ग्राम नागपूर येथे सायंकाळी 5 – 00 करण्यात आले होते.
सदर आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्र नागपूर तर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयु. चंद्रपाल सोनटक्के सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ होते. प्रमुख मार्गदर्शक हेमंत
वाघमारे (MCED)केंद्र प्रमुख होते.
प्रमुख अतिथी अनिल वाळके (BARTI), प्रकल्प अधिकारी होते.
तसेच प्रज्ञा पीठावर तुषार सुर्यवंशी, उमेश पिपंरे,राजेश हाथीबेड, सुनिल तुरकेल उपस्थित होते.
प्रथम तुषार सुर्यवंशी सहायक प्रकल्प अधिकारी यांनी बार्टी या संस्थेकडे असलेल्या संपूर्ण शैक्षणिक व रोजगार संबंधित योजना व कार्यक्रम विषयी विस्तृत माहिती दिली
तसेच अनिल वाळके प्रकल्प अधिकारी बार्टी यांनी या वंचित समाजाला प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हेमंत वाघमारे एमसीईडी चे केंद्र प्रमुख यांनी प्रशिक्षण योजनेची माहिती देताना १८ दिवसीय निःशुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षणाचा REDP लाभ घेवून व्यवसायकडे समाजातील युवकांनी वाटचाल करावी अशी मनापासून इच्छा जाहीर केली. फार्म दाखल करण्याची अंतिम तारीख 17/11/23 असली तरी गरजू व्यक्तीला आम्ही मदत करू हे विश्वास व्यक्त केला.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनटक्के यांनी MCED,व BARTI चे आभार मानून समाजातील सुशिक्षित मुलांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावे , व्यवसाय मध्ये प्रगती करावयाची असल्यास प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षीत होणे आवश्यक आहे त्या शिवाय आपली प्रगती होवू शकत नाही असे सांगितले.
मंचसंचालन प्रा. किशोर बिरला तर आभार निलेश मतेलकर यांनी केले.
या समाज प्रबोधन शिबिरात राजेन्द्र हजारे , राजकुमार खरे,मिलन तांबे ,तिलक त्रिमीले,प्यारेलाल वाघमारे, महेंद्र नाहरकर, जशपाल बिरहा, राकेश समुंद्रे, ओम जानोरकर
विक्रम करिहार,भरत डेलीकर, उमेश तांबे,चेतन बिरीया, विजय बिरहा, सुशील डेलीकर, रोहित हाथीबेड,वैभव पसेरकर,भूपेश पसेरकर,अंश पाटील ,नेल्सन नाहरकर,निर्वाण डेलीकर, संगीता तांबे,उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News