सामाजिक संघटनेच्या वतीने शांतता सभेचे आयोजन
जयंत साठे नागपूर – बुद्धगया महाबोधी विहार मुक्त करण्याकरिता संपूर्ण बौद्ध समाज आंदोलन करीत आहे .तरी अजून पर्यंत महाबोधी विहार मुक्त झाले नाही.
“एखादा धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्मावर नियंत्रण करू नये”
या अनुषंगाने BTMC (अॅक्ट 1949) (बौद्ध टेम्पल मॅनेजमेंट कमिटी) ही कमिटी जोपर्यंत निरस्त होत नाही तोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही.
या बीटीएमसीच्या विरोधात बुद्धगया येथे रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला शांती मार्च चे आयोजन करण्यात आले आहे .त्या समर्थनात संविधान परिवार नागपूर आणि बौद्ध सामाजिक संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 11.00 वाजता संविधान चौक नागपूर येथे शांतीसभेचे आयोजन करण्यात आले आहे . संविधान दिनाच्या पर्वावर या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संविधान दिवस साजरा करू अशी विनंती मुख्य संयोजक संविधान परिवार नागपूर चे प्रा. राहुल मून मछिंद्र सावळे यांनी केली आहे