25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिन उत्साहात साजरा

सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिन उत्साहात साजरा

नागपूर जयंत साठे – संविधान दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागामार्फत 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीला डॉ.विपीन (भाप्रसे), जिल्हाधिकारी नागपूर, यांनी शुभेच्छा देत हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी चंद्रलाल मेश्राम, सदस्य राज्य मागासवर्ग आयोग, पुणे, डॉ. सिध्दार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर, मा.श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर, श्रीमती, आशा कवाडे, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, किेशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर इ. उपस्थित होते. सदर रॅली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर श्रद्धानंदपेठ नागपूर पासून रहाटे कॉलनी, लोकमत चौक, पंचशील चौक, यशवंत स्टेडीयम, व्हेरायटी चौक, झिरो माईल मार्गे संविधान चौक पर्यंत पोहोचल्यावर डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून रॅली चे समारोप करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News