बसपातर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
नागपूर जयंत साठे –सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 133 व्या स्मृतिदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, शहर प्रभारी सुमंत गणवीर, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे यांच्या नेतृत्वात महात्मा फुले मार्केट परिसरातील ज्योतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भर पावसातही बसपा नेते व कार्यकर्ते महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. याप्रसंगी “फुले आपका मिशन अधूरा बीएसपी करेगी पुरा, फुले यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले अमर रहे, महापुरुषो के सन्मान मे बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा, वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा” आदी उस्फूर्त घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने मनपातील माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, अजय डांगे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, विलास सोमकुवर, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, धनराज हाडके, वामन सोमकुवर, महिला नेत्या वर्षाताई वाघमारे, सुनंदाताई नितनवरे, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, युवानेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, प्रकाश फुले, संगीत इंगळे, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, पश्चिम नागपूरचे महासचिव अंकित थुल, बुद्धम राऊत, तपेश पाटील, वैभव देवगडे, अरुण शेवडे, परेश जामगडे, शामराव तिरपुडे, अशोक बोरकर, मनोज गजभिये, अजय गायकवाड, विद्यार्थी शेवडे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.