19 C
New York
Saturday, May 18, 2024

जगन्नाथ मंदिर – राष्ट्रपतीने भेट नाकारली

जगन्नाथ मंदिर – राष्ट्रपतीने भेट नाकारली

नागपूर जयंत साठे ( जिल्हा प्रतिनिधी ) – महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसाच्या नागपूर भेटीत कुकडे लेआउट येथील जगन्नाथाच्या मंदिराला भेट देणार होत्या. ते मंदिर ओरिया समाजाच्या विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्यात आलेल्या नासूप्र च्या जागेवर बांधण्यात आलेले आहे.

तीन महिन्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. आज या मंदिरातील आरती मध्ये राष्ट्रपती महोदया सहभागी होणार होत्या. परंतु हे मंदिर अनधिकृत असल्याने त्यांचा हा आरती दौरा रद्द करण्यात आला.

हे मंदिर अजनी पोलीस स्टेशन ते रामेश्वरी मार्गावरील कुकडे लेआउट येथे आहे. हे मंदिर दोन आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहांच्या मध्ये आहे. या मंदिरासाठी या परिसरातल्या अनेक झाडांची छटाई करण्यात आली होती. या मार्गावरील फुटपाथवर असलेल्या अनेक दुकानांना कालपासून बंद ठेवण्यात आले होते. या मंदिरावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. हा खर्च मंदिर प्रशासनाने केला की शासकीय स्तरावर केला हे कोडेच आहे?

रुग्णालय पळवण्याचे सरकारी षडयंत्र

उत्तर नागपुरातील इंदोरा येथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र जागा असताना, मंजुरी असताना, पैसे असताना, विनाकारण मिहान मध्ये नेण्याचे भाजप-सेना-राकाँ सरकारने षडयंत्र रचले आहे. या षडयंत्र विरोधात हॉस्पिटल बचावसाठी मागील पाच दिवसापासून नागपुरात सर्वपक्षीय जन आंदोलन सुरू आहे. याकडे राष्ट्रपती महोदया यांनी लक्ष द्यावे असे आवाहन बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News