भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन
नागपूर जयंत साठे ( जिल्हा प्रतिनिधी ):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संविधान चौक नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर व श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्या हस्ते माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सुरेंद्र पवार, उपआयुक्त (अजाउयो), समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी भारत केंद्रे, सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय पुणे, श्रीमती आशा कवाडे, संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अतुल वासनिक, सहाय्यक संचालक, श्रीमती किरण चांदेकर, लेखाधिकारी, सुखदेव कौरती, समाज कल्याण अधिकारी, भारत मेश्राम, मनोहर उचे, एकनाथ टापरे, श्रीमती अनामिका बाराहाते, श्रीमती छाया बागडे, श्रीमती अर्चना सातघरे, श्रीमती सारीका बोरकर, श्रीमती जयश्री धवराळ दिनेश सुखदेवे, निखिल मेश्राम, विक्रांत उसरबरसे, शैलेश चव्हाण, गणेश बच्छे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, झोड, राधेशाम गोस्वामी तसेच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.