वणीत भव्य धम्म क्रांती मेळावा
सुरेंद्र इखारे वणी :– येथील संविधान जागर सन्मान मंचाच्या वतीने एस पी एम हायस्कुलचे मागील खुले पटांगणावर (भीमनगर) दिनांक 24 डिसेंबर 2023 रोज रविवारला सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत ” भव्य धम्म क्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा व्याख्याते डॉ राजरत्न अशोकराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांचे ” बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करणे” या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटक विलास वाघमारे सामाजिक कार्यकर्ते, तर स्वागताध्यक्ष जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, प्रमुख अतिथी दिनेश हनुमंते राज्यध्यक्ष म रा भारतीय बौद्ध महासभा , वैभव घबगडे राज्य संघटक म रा भारतीय बौद्ध महासभा , सतीश इंगोले जिल्हाध्यक्ष भा बौ म , अंकुशभाऊ माफुर सचिव सरोदि समाज विदर्भ प्रांत, सुजाता कांबळे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
तेव्हा सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य धम्म क्रांती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी दुपारे, गौतम जीवने, प्रशांत गाडगे, मिलिंद पाटील, रमेश काटकर, देवानंद मुनेश्वर, सुरेश मेश्राम, वंदना पळवेकर, सुकेशनी मुनेश्वर, व संविधान जागर सन्मान मंचाने केले आहे .