भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी अविनाश लांबट यांची निवड
अशोक लोणगाडगे मारेगाव :- तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.
मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांची भारतीय जनता पक्षात काम करण्याची हातोटी व जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे व जनतेचा विश्वास संपादन करणे या त्यांच्या स्वभावामुळे वरिष्ठांनी एक सामान्य कार्यकर्त्यांची निवड मारेगाव तालुकाध्यक्षपदी केल्याने कार्यकर्त्यांत व मारेगावच्या नागरिकांत उत्साहाचे वातावरण असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय भारतीय जनता पक्षाचे माजी गृहमंत्री हंसराज अहिर ,विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व समस्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देत आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .