लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालीका दिन साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले जयंती हा बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आलीआहे.
यावेळी इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित लघुनाट्य तसेच ‘आम्ही सावित्री च्या लेकी ‘ या गाण्यावर नृत्य सादर करून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची व संघर्षाची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली .
मानवी घोसरे हिने ‘मी सावित्री बोलते’ हा एक पात्री,बोलका प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली तीला आदित्य ऊमक याने महात्मा फुलेंच्या वेशभूषेत साथ दिली.धनश्री मुळे,स्वरा भगत यांनी मी सावित्री बोलते या कविता सादर केल्या तसेच रोहण गौरकार,त्रीशा ढुमणे व धनश्री मुथा यांनी सावित्री बाई फुले च्या जीवनावर भाषणे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत गोडे व प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिह परिहार, जेष्ठ शिक्षक राजु पाटील, रविंद्र लिचोडे, चित्रा देशपांडे उपस्थित होते.या प्रसंगी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कु.शरयु बलकी सूत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन कु.आराध्या बोढाले हिने केले.
बालिका दिन कार्यक्रमाच्या प्रमुख स्वाती चांदुरे सह शिक्षक मनीषा ठाकरे, सीमा पांडे, स्वाती चौधरी, अर्चना कडूकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.