25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

तालुकास्तरीय वत्कृत्व स्पर्धेत  लोकमान्य टिळक महाविद्यालय अव्वल

तालुकास्तरीय वत्कृत्व स्पर्धेत  लोकमान्य टिळक महाविद्यालय अव्वल

सुरेंद्र इखारे वणी :- विद्यार्थी वर्गामध्ये जल समस्येबाबत जागृती निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील वक्तृत्व गुणाला चालना मिळावी यासाठी शासनाच्या द्वारे पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग्य वितरण देखभाल दुरुस्ती अशा विविध विषयांना वर कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन्ही स्तरांवर आयोजित करण्यात आलेल्या वणी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोन्ही गटातील प्रत्येकी तीन या स्वरूपात सर्वच्या सर्व सहा ही क्रमांक शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावत विजयी षटकार् ठोकला आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालयातून चैतन्या पालकर, कुणाल ढोके आणि श्रावणी गवाणकर तसेच वरिष्ठ महाविद्यालय गटातून वैष्णवी निखाडे, गार्गी देशपांडे आणि मोनिका क्षीरसागर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
पंचायत समिती वणी येथे आयोजित करण्यात आलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेकरिता या विजयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील डॉ. मानस कुमार गुप्ता, डॉ. स्वानंद पुंड, प्रा.पुरुषोत्तम गोहोकार, प्रा सतीश पोटे यांचे विशेषत्वाने मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा डॉ अभिजित अणे यांनी विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील जिल्हास्तरावरील विजयासाठी शुभकामना प्रदान केल्या आहेत.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News