यवतमाळ जिल्हास्तरीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समस्या निवारण सभा यशस्वीरित्या संपन्न
———————————————
मा श्री किरणराव सरनाईक साहेब यांनी सर्व समस्यांची माहिती घेऊन लोकसेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या कालमर्यादेत कामे करण्याच्या दिल्या सूचना
———————————————
सुरेंद्र इखारे वणी :- आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी स्थानिक श्री वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय,यवतमाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा.श्री किरणराव सरनाईक साहेब उपस्थित होते.या सभेमध्ये नवीन अनुदान आदेश वाटप, सदोष संच मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, भविष्य निर्वाह निधी व एनपीएस पावत्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या या त्यांचे अप्रुव्हल,विविध प्रकारचे प्रलंबित देयके, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पगार खाते वर्ग करणे, सातवा व सहावा वेतन आयोग प्रलंबित हप्ते, तसेच विजाभज व इतर मागास बहुजन विभाग अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेतील शिक्षकांच्या अनियमित वेतनाचा प्रश्न, त्यांचे डीसीपीएस खाते एनपीएस मध्ये वर्ग करणे,विविध अरिअर्स व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन तथा अनधिकृतपणे जोडलेले वर्ग पाचवा व आठवी च्या तुकड्या इत्यादी संदर्भात चर्चा करण्यात आली. भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या 2009-10 पासून प्रलंबित असून वेतन पथक अधीक्षक श्री राठोड यांनी पुढील तीन महिन्यांमध्ये ह्या पावत्या वितरित करण्याची ग्वाही दिली. शिक्षणाधिकारी सौ जयश्री राऊत यांनी अनुकंपा प्रस्ताव ,पद मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन,शालार्थ प्रकरणे, यासंदर्भात एकही प्रकरण प्रलंबित नसल्याचे सांगितले. मा. श्री किरण राव सरनाईक साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना लोकसेवा हक्क कायदा व त्यामध्ये दिलेली कालमर्यादा यानुसार कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. या सभेला अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा. श्री किरणराव सरनाईक साहेब, शिक्षणाधिकारी सौ जयश्री राऊत मॅडम, समाज कल्याणचे सहाय्यक संचालक श्री भाऊराव चव्हाण, प्राथमिक चे शिक्षणाधिकारी श्री पागोरे साहेब,वेतन पथक अधीक्षक श्री राठोड साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री गुंडे, मिर्झा मॅडम, स्मिता गावडे मॅडम,श्री आशिष वाघाडे, योगेश डाफ, ज्योत्स्ना तिजारे,श्री धबाले सर, शेख तनवीर शेख नूर, अंसारुद्दीन हसूनोदिन काझी, स्वप्निल फुलमाळी, तुषार आत्राम, श्री तुळशीराम जाधव, श्री शरद घारोड, श्री संजय येवतकर, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे सचिव श्री भास्करराव सोनूणे, प्रा.श्री अनिल मडके, मुख्याध्यापक श्री विठ्ठल वाणी सर, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री गोटे सर, श्री सुधाकर बांगर सर, प्रोटॉन संघटनेचे गजानन उल्ले सर,श्री बीके राठोड सर,जयंत सरनाईक,प्रविण खडसे तथा मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.