“लायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव सुभाष चंद्र बोस जयंती साजरी”-—————–
सुरेंद्र इखारे वणी :- येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव सुभाष चंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक लंकेश चुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद सेनेचे योगदान,शौर्य व बलीदान’ यावर आधारित लघुनाटय सादर करून, सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला कसे समर्पित केले हे नाट्य प्रसंगातून उपस्थितांना दाखवून दिले.तसेच विद्यार्थ्यांनी सुभाषबांबूच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
सुरुवातीला प्राचार्य द्वय प्रशांत गोडे, दिपासिह परिहार, जेष्ठ शिक्षक राजु पाटील, रविंद्रनाथ लिचोडे, चित्रा देशपांडे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशगौरव सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.