“लायन्स हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा”——
सुरेंद्र इखारे वणी :- येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी मा.आमदार,लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संजीव रेड्डी बोदकुरवार, ट्रस्ट चे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव लायन सुधीर दामले, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा,माजी अध्यक्ष लायन शमीम अहमद, माजी सचिव लायन महेंद्र श्रीवास्तव, क्लब चे सचिव लायन किशन चौधरी, प्राचार्य प्रशांत गोडे व प्रा.दिपासिह परिहार प्रामुख्याने उपस्थित होते
ध्वजारोहणा नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारीत रोमहर्षक व आकर्षक समुह नृत्ये, कवायती, पिरॅमिड आदी सादर करून तसेच उत्स्फूर्त भाषणे देऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. यात छत्तीसगड राज्याचे ‘सुहा व नाच्या’ लोकनृत्य, लोकसंगीत, ऐतिहासिक व समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणारी “छत्तीसगड की झांकी”विशेष उल्लेखनीय व डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
यावेळी प्रमुख अतिथी मा.आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य प्राप्त करून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कर्तव्ये पार पाडल्यास भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र सैनिकांच्या संकल्पनेतील सामर्थ्यवान भारत उदयास येईल असे मनोगत व्यक्त करुन घटना कार व स्वातंत्र सैनिकांना अभिवादन केले तसेच लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित पालकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देऊन संबोधित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले सूत्रसंचालन सौ चित्रा देशपांडे व सौ सोनाली काळे यांनी केले तर विकास चौधरी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.