वणी उपविभागीय कार्यालयाने आगामी निवडणुकीसाठी छायाचित्रांसह मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला
5 हजार 43 तरुण पहिल्यांदा मतदान करणार
2लाख 78 हजार 850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
सुरेंद्र इखारे वणी :- लोकसभा व विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहे त्यासाठी वणी उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघाचे सुसूत्रीकरण करण्यात आले. सुसूत्रीकरणापूर्वी वणी विधानसभा मतदार संघात 324 मतदान केंद्र होती यामध्ये 16 ठिकाणी नवीन मतदान केंद्र स्थापित करण्यात आली त्यात दोन मतदान केंद्र विलीन करण्यात आली त्यामुळे एकूण मतदान केंद्र 338 झाली आहेत.
वणी विधानसभा क्षेत्रात 270111मतदार आहेत यावर्षी 11727 नवीन मतदारांची वाढ झाली आहे निवडणुकीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी नवं मतदारांना नोंदणी करता येईल ती पुरवणी यादी म्हणून जोडल्या जाईल व मतदान करता येईल असे नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे यांनी सांगितले आहे. प्रारूपी यादीनुसार एकूण मतदार 270111 यामध्ये पुरुष 140145 व स्त्री मतदार 129946 होते . प्रारूप मतदार यादीचे प्रसिद्धी नंतर छायाचित्र मतदार यादीचे पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये नवीन मतदार करण्याकरिता वणी विधानसभा मतदार संघातील 23 महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर घेऊन यामध्ये 2699 मतदार नोंदणी करण्यात आली तसेच महिला मतदार कमी असल्याने अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, उमेद महिला बचत गटाची सभा घेऊन यांचे माध्यमातून 942 महिला मतदार वाढविण्यात आले. तसेच भटक्या, विमुक्त व कोलाम जमाती करिता तीन तालुक्यात 8 शिबीर घेण्यात आली असून यामध्ये 191 नवीन मतदार करण्यात आले. नवीन मतदार नोंदणी करीत असताना डबल नावाची छाननी करणे, मृत मतदारांची नावे कमी करणे, असा उपक्रम राबविण्यात आला आहे त्यामुळे मतदार यादी अद्यावत झाली आहे. याप्रक्रियेमधून 11727 मतदार नोंदणी करण्यात आली असून अंतिम मतदार यादीमध्ये 278850 मतदार आहे यामध्ये 143681 पुरुष तर 135167 स्त्री व 2 तृतीयपंथी असे मतदार आहे. यावर्षी तरुण वयोगटातील 5हजार 43 मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. तसेच मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करून शहरातील महाविद्यालयाच्या वतीने भव्य प्रभातफेरी व पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी मतदारांना मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली व ज्यांची मतदार नोंदणी झाली नाही अश्या मतदारांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले यावेळी तहसीलदार निखिल धूळधळ, नायब तहसीलदार विवेक पांडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व टीडीआरएफ ची चमू उपस्थित होती.