सार्वजनिक महिला समाज मंडळाचे वतीने प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी:- येथील सार्वजनिक महिला समाज मंडळाचे वतीने भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी वणी येथील भारतीय सीमेवर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्ष सौ शालिनीताई गंगशेट्टीवार यांनी महिला मंडळाचे वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांचा सत्कार व्हावा म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलीमाताई काळे ह्या होत्या सत्कारमूर्ती माझी सैनिक श्री मधुकर धगडी, श्री विश्वेश्वर चवने ,श्री नामदेवराव शेळके ,श्री ऋषि गाताडे, श्री भडगरे ,श्री निलेश इन मूलवार ,श्री कुकडे ,श्री ज्ञानेश्वर मोहिते ,श्री बंडू वाढइ , श्री शेख मेहमूद , श्री रफिक भाई, उपस्थीत होते . यावेळी भारतीय सेनेतील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांनी सत्काराला उत्तर देताना सीमेवरील अनुभव कथन केले हे ऐकून सर्व महिला भारावून गेल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहलता चुंबळे यांनी केले व त्यांनी स्वरचित स्वागत गीत गायिले ,श्रीमती स्मिता गोरंटीवार यांनी सैनिका करिता कविता नमूद केली, सौ सपना पावडे यांनी सैनिका बद्दल मनोगत व्यक्त केले सौ नीलिमाताई काळे यांनी अध्यक्षीय भाषण करून ” ये मेरे वतन के लोगो” हे देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आभार सौ सपना पावडे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सार्वजनिक महिला समाजातील कार्यकारिणी व महिला सदस्य यांनी सहकार्य केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली