वणी येथे शिंपी समाज महिला मंडळाच्यावतीने हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम
सुरेंद्र इखारे वणी ::- शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने श्याम भवन, टागोर चौक येथे मकरसंक्रांती निमित्त हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले .
वणी येथे 11 फेब्रुवारीला होणाऱ्या ओबीसी जनगणना झाली पाहिजे ह्या मोर्चा विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच समाजातील जेष्ठ महिला नागरीक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी यांच्या पत्नी सौ. रोहिणी गणेश किंद्रे, प्रमुख अतिथी म्हणून वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या पत्नी सौ.तृप्ती जाधव, तसेच श्री लक्ष्मीनारायण बँकेच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय खाडे व सौ. सुमित्रा ताई गोडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संध्या रामगिरवार, सूत्रसंचालन सौ. किरण वऱ्हाडे व सौ.शिल्पा दिकुंडवार आणि आभार प्रदर्शन सौ प्रतिभाताई मंथनवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. लता गटलेवार, वर्षा वऱ्हाडे, वैशाली नोमूलवार, सीमा कर्नेवार,अश्विनी रामगिरवार,संगीता आक्केवार, अर्चना वऱ्हाडे तसेच समस्त शिंपी समाज महिला भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.