वाहतूक नियमांचे पालन सुरक्षित मानवी जीवनाचा अविभाज्य भाग – सीता वाघमारे उपनिरीक्षक
लायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात “रस्ता सुरक्षा अभियान”
सुरेंद्र इखारे वणी :– येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात “राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमा”अंतर्गत व वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियंत्रण,उपशाखा वणी जिल्हा यवतमाळच्या वतीने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमां बाबत माहिती व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणीच्या उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त संवाद साधून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सुरक्षित मानवी जीवना साठी आवश्यक असून केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आपण हेल्मेट व सीटबेल्ट चा वापर करतो.हे योग्य नसून आपण सर्वांनी वाहतूक नियमांची माहिती व तीच्या पालनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले.
रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष लायन बलदेव खूंगर हे होते , तसेच वाहतूक पोलीस गोपाल हेपट व प्राचार्य प्रशांत गोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला वर्ग आठवी ते बारावी चे विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन लंकेश चुरे यांनी केले तर प्राचार्य प्रशांत गोडे यांनी आभार मानले.सौ.स्वाती चौधरी,सौ.सुरभी पाते, संकेत आक्केवार व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.