मदनापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवस श्रमसंस्कार शिबीर
नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांनाचा सर्वांगीण विकास
सुरेंद्र इखारे वणी :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मदनापूर खुर्द येथे आयोजित करण्यात आले होते.
युवा भारत, विकसित भारत, सशक्त भारत हे शिर्षक साध्य करत सदर शिबीर नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. घनकचरा व्यवस्थापन, संविधान जनजागृती, जल संवर्धन, महिला मेळावा, स्वच्छ गाव अभियान, अंधश्रद्धा जनजागृती निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, शासकीय योजना जनजागृती, प्रभातफेरी अशा विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग लक्षणीय ठरला.
या विशेष शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. जीवन पाटील कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक मा. नरेंद्रपाटील ठाकरे , प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर, मा. गौरीशंकर खुराणा, मा. मारोती गौरकार, मा. महेंद्रकुमार बोथरा, मा. अंकुशजी माफूर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व स्वयंसेवकांची विविध गटामध्ये विभागणी करून या गटांना विविध समाजसुधारकांची नावे दिली गेली. समाजसुधारकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या दिवशी सामूहिक ध्यान, योगासने, प्रभात फेरी, सामूहिक प्रार्थना, चर्चासत्रे आणि श्रमदान या शिबिरातील दिनचर्याची रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच बौद्धिक सत्रामध्ये डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे योगदान विषयी मार्गदर्शन केले प्रा. अक्षय जेणेकर, डॉ. शैलेश आत्राम यांनी विचार व्यक्त केले तसेच भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, नवरगाव यांच्यावतीने समाज प्रबोधनपर भजनाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजन केले.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनात विधवा महिलांसाठी वाण वाटप व खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन उपस्थित सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यात आला. याप्रसंगी डॉ. विभा घोडखांदे, डॉ. मंजू परदेशी व प्रा. राजश्री गडपायले यांनी महिला सक्षमीकरण तर डॉ. माधुरी तानुरकर उपस्थित होत्या. तसेच डॉ. विश्वजीत कांबळे, मोघे कॉलेज केळापूर यांनी स्पर्धा परीक्षा व रोजगाराच्या संधी या विषयावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. एन. आर. पवार, प्रा. शैलेश कांबळे व प्रा. रुपेश वांढरे उपस्थित होते लोकनाट्य व लोककलेच्या आधारे गावकऱ्यांचे मनोरंजन केले.
तसेच डॉ. निलिमा दवणे यांनी विद्यार्थी जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व तर डॉ. श्रीराम खाडे, डॉ. संतोष गायकवाड यांनी रोजगारांच्या संधी या विषयावर तसेच डॉ. अभिजित अणे यांनी रोजच्या जीवनात शब्दांचे महत्त्व तर डॉ. विनोद चव्हाण व प्रा. प्रदीप माकडे यांनी मृदा संवर्धन व वन संवर्धन ह्या विषयावर विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले. तसेच केलोडे रुग्णालय, मारेगाव येथील डॉ. सपना केलोडे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप घेण्यात आले. यामध्ये 76 रुग्णांनी लाभ घेतला.स्व माणिकराव ठीकरे यांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे डागडुजी करण्यात आले यानंतर या शिबिराचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून शिस्त, व्यक्तिमत्व विकास व राष्ट्रसेवा यांचे अनुकरण करावे यावर अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. गजानन सोडणर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना सांगितले की विद्यार्थी दशेत समाजसेवेची जाण प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. याप्रसंगी पोलीस पाटील भास्करराव पिंपळकर, प्रा. सुधीर चिरडे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते
उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मुलांमधून धनराज सोनुले तर मुलींमधून निकिता गुग्गुल यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या शिबिराकरता महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय भगत प्रा. माधुरी शेंडे व प्रा. स्नेहल भांदकर यांनी अथक परिश्रम घेतले सोबतच डॉ. नितेश राऊत सरांनी नित्यनियमाने योगासन शिबीर घेतले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू सरांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विनीत खोके व आचल किन्हेकार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.तसेच कर्मचारी राहुल पिंपळकर यांच्या अथक परिश्रमाने शिबिर यशस्वीरित्या पार पडले.