12.4 C
New York
Saturday, April 20, 2024

वैष्णवी निखाडे हिचे सुयश

वैष्णवी निखाडे हिचे सुयश

सुरेन्द्र इखारे वणी :-     विद्यार्थ्यांमध्ये जल समस्येची जाणीव निर्माण होऊन जनप्रबोधनाच्या माध्यमातून या विषयावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जल जीवन योजनेच्या अंतर्गत जिल्हा परिषद यवतमाळ द्वारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीमध्ये आयोजित तालुकास्तरावर विजयी झालेल्या कनिष्ठ आणि वरीष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.
यामध्ये वरीष्ठ महाविद्यालय स्तरावर वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वैष्णवी बंडू निखाडे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल तिला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती यवतमाळ जालिंदर आभाळे आणि कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद निलेश काळबांडे यांच्या हस्ते परीक्षकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि २१००० रुपयाच्या बक्षीसाने गौरवान्वित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात मिळविलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक गण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या द्वारे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्रदीर्घ काळानंतर वणीच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीने प्राप्त केलेल्या या यशाने वणी पंचायत समितीचा देखील गौरव झाला आहे असे म्हणत गटविकास अधिकारी किशोर गुज्जलवार यांनी पंचायत समितीच्या वतीने तिचे अभिनंदन केले आहे.
यवतमाळ येथे आयोजित या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वणीच्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुभाष लोखंडे यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News