कळमना येथील भास्करराव ताजने विद्यालयात वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
गुरुदेव सेवा मंडळाकडून विद्यार्थ्यांना ग्रामगीता युगग्रंथाची भेट
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कळमना येथील भास्करराव ताजने विद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना वर्ग 8व9च्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले . कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा योग साधून अखिल मानव जातीला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून विरचित झालेल्या ग्रामगीता या युगग्रंथाची भेट वर्ग 10 वी तील सर्व विद्यार्थ्यांना गुरूकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ वणी यांच्याकडून देण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सरपंचा सौ.वदना अगिरकर, प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा प्रचारक प्रमुख श्री मारोतराव ठेंगणे, ग्रामगिताचार्या सौ विजयाताई दहेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, दिलीपराव डाखरे, भानुदासजी काकडे, ज्ञानेश्वरजी कडूकर, मुख्याध्यापक आत्माराम ताजने हे उपस्थित होते.या प्रसंगी विचार व्यक्त करताना जिल्हा प्रचारक मारोतराव ठेंगणे म्हणाले “सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू”असे म्हणत वर्ग 10 वी म्हणजे जीवनातील पहिली पायरी आहे.तसेच जीवनात अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी व एक यशस्वी माणूस होण्यासाठी ग्रामगीता निश्चितच प्रेरणादायक ठरेल असा सार्थ विश्वास विद्यार्थ्यांना दिला . यावेळी विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षांत मिळालेले शैक्षणिक अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक दत्तु महाकुलकर यांनी केले, प्रास्ताविक कु.शारदा खडसे यांनी केले तर आभार प्रफुल्ल गोलाईत यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता,कु.मनिषा ताजने, योगेश किनाके, उत्तम सुर, भालचंद्र उमरे, प्रमोद पाचभाई, किशोर ढवस, ऋतुजा गोहोकार, श्रुती भोयर, तन्वी पिंपळशेंडे, तन्वी वरारकर,चंदना बोर्डे, प्राजक्ता माहुरे, अर्चिता अगिरकर व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.