19 C
New York
Saturday, May 18, 2024

महाभारताच्या विदूरणीतीतून जगाचे आर्थिक  प्रश्न सुटू शकतात   – डॉ. प्रशांत बोकारे

महाभारताच्या विदूरणीतीतून जगाचे आर्थिक  प्रश्न सुटू शकतात   – डॉ. प्रशांत बोकारे

सुरेंद्र इखारे वणी  :-  ” इसवी सन १८२० पर्यंत जगाच्या अर्थकारणात भारताचा फार मोलाचा वाटा होता. इंग्रजांनी या देशातील ही अफाट संपत्ती लुटून नेली मात्र आज त्या इंग्रजी सत्तेची अवस्था केविलवाणी झाली आहे. औद्योगिक क्रांतीचा आधार म्हणविली गेलेली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अर्थ आणि काम यांच्या मागे लागलेला आहे अमेरिकेतील युवक निराश उद्विग्न आहे. युरोपाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी भारतीय बुद्धिवंतांना आवाहन केले जात आहे. भारताने अर्थ आणि काम या दोन्ही गोष्टी धर्माधिष्ठित असायला हव्यात यावर भर दिला. महाभारताच्या सभापर्वत विदुरनीतीत आलेल्या अर्थचिंतनाच्या आधारेच जगाचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात आणि भारत आर्थिक महासत्ता बनू शकते.” असे विचार गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित प्राचार्य राम शेवाळकर स्मृती व्याख्यानात ते ” महाभारतातील अर्थकारण ” या विषयावर व्यक्त होत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तथा सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के संचालक उमापती कुचनकार, सुरेश शुक्ल, अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे यांनी व्याख्यानमालेच्या इतिहासाला उजाळा देत प्रकाश एदलाबादकर यांच्या शब्दात नानासाहेब शेवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अभिवादन केले.
आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण विषयात महाभारतातील विविध श्लोकांचा संदर्भ घेत डॉ.प्रशांत बोकारे यांनी यज्ञ,दान आणि उदरभरणासाठी पुरेसे धन आहे का? या प्रश्नातच पैशाकडे पाहण्याची भारतीय भूमिका समजून घेता येते असे म्हणत ” तू धनाच्या लोभात पडून कामोपासना तर करीत नाहीस ना ?” या प्रश्नातून भारतीय जीवन दर्शन प्रगट होते हे अधोरेखित केले. आर्य चाणक्य, धनानंद, चंद्रगुप्त, बिंबिसार अशा विविध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा परामर्श घेत त्यांनी आपल्या विषयाचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी भारतीय चिंतनाच्या आधारे भारत कसा आर्थिक महासत्ता होऊ शकतो हे विशद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज जंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, औषधी निर्माण शास्त्र विभाग आणि शिक्षण प्रसारक विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह वणीतील गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News