संविधानिक अधिकाराने सगळ्यांचे कल्याण होईल – डॉ. खांदेवाले
जयंत साठे नागपूर : आम्ही भारताचे लोक हे शब्द आमच्यासाठी एक धागा आहे,जो आम्हाला एका सूत्रात बांधून ठेवते. उत्पादन साधनं व संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी संविधान निर्देश देतात. संविधानातील निर्देशक तत्वे व मुलभूत अधिकाराने सगळ्यांचे कल्याण होणार आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. ते पुढे म्हणाले की, देशात विषमता वाढत आहे. भारताची अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था कशी असावी हे संविधानात अंतर्भूत आहे. १९४२ लोक स्वातंत्र्यासाठी उतावळे झाले होतो.गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली. आता भारतात राज्य चालवणे सोपे नाही याची जाणीव ब्रिटीशांना झाली होती. भारताचे स्वातंत्र्य कसे असावे यासाठी संविधान समिती स्थापन करण्यात आली. १९४९ ला संविधान तयार झाले. त्यावेळी लोकांची समज कशी होती. रशिया तील समाजवादी विचारांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाचा पुरस्कार केला. संविधानिक लोकशाही अस्तित्वात आली पाहिजे. राज्य दिसत नाही पण ते संविधानाच्या प्रास्ताविकेत आहे. आम्ही भारताचे लोक येथे राज्य दिसते. भारतीय लोक म्हणजेच राज्य होय. असेही ते म्हणाले.
संविधानधिष्ठीत भारतीय अर्थव्यवस्था आणि मागील दहा वर्षातील तिचे बदललेले स्वरूप या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. २०२४ च्या निवडणूकच्या संदर्भातील अर्थशास्त्रीय परिसंवादात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गौतम कांबळे, डॉ. असलम बारी, डॉ. अमिताभ पावडे, प्रा . जावेद पाशा उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, या देशात जे श्रीमंत होते ते अधिक श्रीमंत होत आहे. केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. नागपूर सारख्या शहरात नोकरीच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाही. इथल्या मुलांना पूण्या मुंबईत जावे लागत आहे. १२० कोटी लोकांना कुठलेही भवितव्य उरले नाही. बांगलादेश, श्रीलंका, व पाकिस्तान पेक्षा आम्ही मागासलेले आहो. अमेरिकेच्या धर्तीवर आमचे माॅडेल आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला देशोधडीला लागले आहे. दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशातील दहा टक्के लोकांजवळ ७७ टक्के संपत्ती आहे. त्यांच्यासाठी हे अच्छे दिन आहे. संपत्तीचे विषम वितरण लोकशाहीसाठी घातक आहे. हे सरकार जमातवादी राजकारणाला प्रोत्साहन देतात ते देशासाठी घातक आहे असेही ते म्हणाले.डॉ.
अमिताभ पावडे म्हणाले की, समता का आली नाही हा प्रश्न सरकारला विचारले पाहिजे. सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस आमच्यात नाही. २२ हजार टन सोने भारतीय स्त्रिया जवळ आहे. ४५ लाख ट्रिलीयन संपत्ती ब्रिटीशांनी लुटून नेली. युरोपियन शेतकरी एक पीक घेतो भारतीय शेतकरी तीन पीक घेऊन ही त्यांची बरोबरी करू शकत नाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार घेतला. भारत आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करीत आहे. तथापि पाणी वाचविण्याचे धोरण न राबवता सरकार समृध्दी महामार्ग व बुलेट ट्रेन सुरु करतात. यासाठी आपणच दोषी आहोत, असेही ते म्हणाले.
संचालन नेहा गोडघाटे यांनी केले.