वणी येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने 9 वि ते 12 वि पर्यंतच्या शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण
सुरेन्द्र इखारे वणी :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संताजी इंग्लिस मिडीयम स्कुल वणी येथे प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण ” माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणाचे उदघाटक प्रशिक्षणाचे समन्वयक श्री विनोद नासरे सर, प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका कुरेकर मॅडम ह्या होत्या. तसेच प्रशिक्षक आनंद हूड, गणेश लोहे, प्रितेश लखामापुरे, वैद्यनाथ खडसे, सुनील झाडे, प्रमुना भोयर, ज्योती बडे, वंदना शंभरकर हे उपस्थित होते. यावेळी समन्वयक विनोद नासरे यांनी उदघाटन प्रसंगी विचार व्यक्त करताना म्हणाले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलात केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरांपासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी दिला. कुरेकर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातुन प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रशिक्षक गणेश लोहे व वैद्यनाथ खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार येथील सहायक शिक्षक राकेश दीकुंडवार यांनी केले .प्रशिक्षणाचे पहिल्या दिवशीच्या यशस्वीतेसाठी वणी पंचायत समिती शिक्षण विभाग व संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका व येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले