12.4 C
New York
Saturday, April 20, 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रशिक्षणात पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर यांचे मार्गदर्शन  

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रशिक्षणात पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर यांचे मार्गदर्शन  

 सुरेंद्र इखारे वणी :-  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी  माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात सायबर सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता वणी येथील पोलीस स्टेशनचे सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार यांचे मार्गदर्शन लाभले .

 वणी येथे संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणात  विचार व्यक्त करताना पोलीस निरीक्षक झाडोकर म्हणाले आज विद्यार्थ्यांमध्ये  तंत्रज्ञानाचा  वापर मोठ्या प्रमाणात होत आहे  त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  सुरक्षा व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे  या तंत्रज्ञानाचा वापर  हॅकर मोठ्या प्रमाणात करत आहे त्यामुळे  त्याचा फटका विद्यार्थी ,शिक्षक , पालक व अनेक नागरिकांना बसला आहे. तसेच  तंत्रज्ञानाचा उपयोग करून आर्थिक नुकसान पोहचवू शकते , प्रतिष्ठेला धोका निर्माण करू शकतात  तेव्हा विद्यार्थी व शिक्षक यांनी या हॅकर पासून वाचण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड ठेवावा तसेच आभासी फोनवर ओटीपी देऊ नये, तरच आपली सुरक्षितता ही आपल्याच हातात आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षणाचे समन्वयक विनोद नासरे यांनी या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सायबर क्राईम या विषयाकरिता वणीचे पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले याप्रसंगी वैजनाथ खडसे, आनंद हूड, गणेश लोहे, सुनील झाडे, प्रमुना भोयर, ज्योती बडे, वंदना शंभरकर ,प्रितेश लखामपुरे उपस्थित होते . या विषयाचे निमित्ताने प्रशिक्षणाचे प्रशिक्षक प्रितेश लखामपुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News