राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 च्या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणाचा समारोप
सुरेंद्र इखारे वणी :– वणी येथील संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक परिषद पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी प्रशिक्षणाची अमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने आज दिनांक 6 मार्च 2024 रोजी ” माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीचे गटविकासअधिकारी किशोर गज्जलवार साहेब हे होते प्रमुख अतिथी तालुका समन्वयक विनोद नासरे सर व प्रशिक्षक मार्गदर्शक प्रा गणेश लोहे, प्रितेश लखमापुरे सर, प्रा आनंद हूड, वैजनाथ खडसे सर, सुनील झाडे सर ,कु प्रमुना भोयर मॅडम , कु ज्योती बडे मॅडम ,कु वंदना शंभरकर मॅडम उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षणार्थी आनंद शोभने सर , मालेकर सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रशिक्षक मार्गदर्शक वैजनाथ खडसे सर यांनी प्रशिक्षणामध्ये एकात्मिक दृष्टीकोणाच्या माध्यमातून विविध 12 विषयांचा समावेश करण्यात आले आहे या अनुषंगाने मार्गदर्शन करून या नवीन ज्ञानाचा उपयोग शिक्षक निश्चित करतील व विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून विचात व्यक्त करताना गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार म्हणाले हा शासनाचा पॅटर्न जरी ग्लोबल असला तरी शिक्षकांनी ग्लोबल होण्याची गरज आहे त्यासाठी शिक्षकांमध्येच इच्छा शक्तीची गरज आहे तरच येणार भविष्य आत्मनिर्भर होईल कारण शासनाचे प्रशिक्षण चालूच राहणार आहे हा शासनाचा भाग आहे त्यामुळे त्यांच्या विचारातून विद्यार्थ्यांनप्रति व शिक्षणाविषयीची तळमळ त्यांच्या भाषणातून दिसून आली आहे . समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कु स्वेता राऊत हिने केले तर आभार तालुका समन्वयक विनोद नासरे सर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वणी पंचायत समिती शिक्षणविभाग व संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.