Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedपदयात्रेत  251 किलोवजनाचा  भव्य त्रिशूल भक्तांच्या खांद्यावर  

पदयात्रेत  251 किलोवजनाचा  भव्य त्रिशूल भक्तांच्या खांद्यावर  

पदयात्रेत  251 किलोवजनाचा  भव्य त्रिशूल भक्तांच्या खांद्यावर  

उडत्या त्रिशूलाचे आकर्षण ; ठिकठिकाणी  शिवभक्तांचे स्वागत 

सुरेंद्र इखारे वणी :- महाशिवरात्रीच्या निमित्ताने वणीच्या भाविक भक्तांनी शिरपूर येथील कैलास गड सर करण्याकरिता  15 किलोमीटरच्या भव्य त्रिशूल पदयात्रेचे आयोजन केले .

ही भव्य त्रिशूल पदयात्रा   वणी  येथील बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 11 वाजता निघाली. ही भव्य त्रिशूल पदयात्रा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून निघाली .  या पदयात्रेत 251 किलोंचा त्रिशूल खांद्यावर घेऊन हजारो भाविकभक्तासह वणी ते शिरपूर अशी पदयात्रा अतिशय उत्साहात काढण्यात आली. माजी केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चारगाव चौकीवर येऊन सर्व भाविकांची भेट घेऊन यात्रेत सहभागी होऊन भक्तांचा उत्साह वाढविला तसेच  विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले होते.

मागील वर्षांपासून माजी नगराध्यक्ष तरेंद्र बोर्डे यांचे नेतृत्वात  वणी ते शिरपूर अशी भव्य त्रिशूल यात्रा काढली जात आहे. यावर्षी उडता त्रिशूल व दिल्ली येथील शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.तसेच  वणीच्या कलावंतांनी  आपल्या कलेचे प्रदर्शन करून जनसमुदयाला आकर्षित केले. या त्रिशूल यात्रेत सहभागी भाविकांसाठी अभिषेक करण्यासाठी वाराणसी येथून आणलेले पवित्र गंगाजल उपलब्ध करून दिले गेले. या पदयात्रेत जैन ले- आऊट, आंबेडकर चौक, गणेशपूर, गोकुळनगर सह शहरातील हजारो शिवभक्त व वणी ते शिरपूर मार्गावरील गावातील भाविक भक्त सहभागी झाले होते. वणीच्या बसस्टँड जवळील हनुमान मंदिरातून निघालेली ही भव्य त्रिशूल रॅली टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथस्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी ते शिरपूर गडावर  पोहचली. या यात्रेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रशांत भालेराव, गजानन कासावार, नीलेश परगंटीवार, कुणाल चोरडिया, अनिल अक्केवार, बंडू चांदेकर, नीलेश पोल्हे, जयेश चोरडिया, मनीष गायकवाड, सारंग बिहारी, निखिल खाडे, गुंजन इंगोले, शरद ढुमणे, सुभाष बिलोरिया, अनिल रेभे, मंगेश झाडे, किशोर बावने सह शिवभक्तांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments