वणीत जागतिक महिला दिनानिमित्य भव्य महिला मेळाव्यात ” स्रीपंख सांस्कृतिक महोत्सव”
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ; प्रयास महिला विचार मंच व क्रांतीज्योती शहर स्तर संघाने केले
सुरेंद्र इखारे वणी :- प्रयास महिला विचार मंच व क्रांतीज्योती शहर स्तर संघ वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक महिला दिनानिमित्याने 10 मार्च रोज रविवारला सकाळी 11.00 वाजता एस बी हॉल वणी येथे ” भव्य महिला मेळावा ; स्रीपंख सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्याने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा व विविध क्षेत्रात सन्मान प्राप्त झालेल्या महिलांचे मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी घेऊन येत आहे या निमित्ताने कार्यक्रमाच्या उदघाटिका अभिनेत्री तथा उद्योजिका वंदना भारद्वाज मुंबई, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी सिने अभिनेत्री तथा बॉक्सिंग राष्ट्रीय खेळाडू काजल राऊत उपस्थित राहणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात सिंगल डान्स ग्रुप डान्स ,करओके सॉंग स्पर्धा फॅशन शो , उद्योजक महिला गट प्रदर्शन व बक्षीस वितरण सोहळा साजरा केला जात आहे.
तेव्हा या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पौर्णिमा शिरभाते, वणीता खंडाळकर, ऋणाली मस्के, संध्या खामनकर, मंजित कौर, राजश्री गौरकार, बबिता पडोळे, संगीता मांढरे, अश्विन रंगुरवार, किरण शिरनाथ, छाया जांभुळकर, वर्षा लाकडे, तृप्ती माळीकर, वंदना काकडे, रंजना भांडारवार, शारदा दोरखंडे, बेबी महाकूलकार, शिल्पा बेतवार, वर्षा पराळे, वैशाली पंचोले, अनिता चंदने, सपना देठे, भारती पेंदोर यांनी केले आहे.